धरणगाव (प्रतिनिधी) शहर बाळासाहेबांची शिवसेनेच्या शहर प्रमुखपदी सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
धरणगाव येथील बालाजी टेंड संचालक हेमंत चौधरी यांच्या धर्मपत्नी रेखाताई चौधरी यांची शिंदे गटाच्या धरणगाव महिला शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा महिला संपर्क प्रमुख सरिताताई कोल्हे, जिल्हाप्रमुख निलेश पाटील,उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील सर,तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, उपतालुका प्रमुख संजय चौधरी, जळगाव जिल्हा मागासवर्गीय सेल जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे, युवा नेते प्रतापराव पाटील, मागासवर्गीय महिला तालुका प्रमुख मायाताई देवरे तसेच धरणगाव शहरातील सर्व नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या निवडीबद्दल भारतीताई चौधरी यांचे अभिनंदन केले आहे.
















