धरणगाव (प्रतिनिधी) शहरात सालाबाद प्रमाणे १८ व १९ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या कावड यात्रेसाठी धरणगाव भोले सरकार मित्र परिवाराराकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आज सकाळी निमंत्रण दिले. यावेळी गुलाभाऊंकडून कावड यात्रेसाठी नटराज भगवान यांची मूर्ती भेट देण्याचे जाहीर केले.
भोले सरकार मित्र परिवार सार्जेश्वर महादेव मंदिर सालाबादप्रमाणे आयोजित श्रावण महिन्यातील मानाच्या पवित्र कावड यात्रा निघणार आहे. सार्जेश्वर महादेव मंदिर धरणगाव यांच्या मार्फत सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पवित्र श्रावण महिन्यात महाकावड यात्रेचे आयोजन दि. १८ व १९ ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे. यात्रेच्या निमंत्रण देण्यासाठी आज भोले सरकार मित्र परिवारातील सदस्यांनी गुलाभाऊंची भेट घेतली. यावेळी सिद्धार्थ वाघरे, निलेश चौधरी, राज चौधरी,राज पाटील, चेतन चौधरी,उल्केश धर्माधिकारी, धीरज पाटील, तुषार पाटील, बंटी चौधरी, मुकुल चौधरी,करण येवले, आकाश धनगर, निलेश चौधरी, बाळा मराठे, प्रथमेश चौधरी, पवन चौधरी यांच्यासह आदी उपस्थित होते. दरम्यान, गुलाभाऊंकडून कावड यात्रेसाठी नटराज भगवान यांची मूर्ती भेट देण्याचे जाहीर केले.
कावड यात्रेची रूपरेषा खालील प्रमाणे !
दिनांक १८ ऑगस्ट संध्याकाळी तापीमातेचे पूजन व रात्री ९ वाजेला इंदिरा गांधी महाविद्यालय येथून खाजगी वाहनाने (ट्रक) सर्व भक्तगण तापी नदीवर कावड भरण्यासाठी रवाना होतील. दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेला तापी नदीवरून कावड भरून सर्व भक्तगण सकाळी ७ वाजेला धरणगाव शहरात दाखल होतील. धरणगाव शहरात दाखल झाल्यानंतर शहरात कावड यात्रेची मिरवणूक डेरू पथक, झांज पथक व वाजंत्री सह गावातून फिरवून सार्जेश्वर महादेव मंदिर येथे सकाळी ११ वाजेला दाखल होईल. मिरवणुकीचा मार्ग माउली वारकरी शिक्षण संस्था हनुमान नगर येथून निघेल डेलची चौक वाणी गल्ली धरणी चौक कोट बाजार, परिहार चौक, बजरंग चौक, बालाजी पतसंस्थे समोरून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बसस्थानक समोरून सार्जेश्वर महादेव मंदिर येथे कार्यक्रमाची सांगता होणार आहे.