TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : आरोपी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण ; उद्या सरकारी पक्ष म्हणणे करणार सादर !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ५ संशयितांच्या जामीन अर्जावर आज पुणे न्यायालयात कामकाज झाले. आरोपी पक्षाने आज आपला युक्तिवाद न्यायालयात सादर केला. तर उद्या (मंगळवारी) सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण युक्तिवाद सादर करणार आहेत. दरम्यान, याआधी २ जुलै रोजी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या वकिलांनी आपली बाजू मांडलेली आहे.

 

READ ALSO

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

बीएचआर मधील साधारण १२०० कोटीच्या घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२० आणि २०२१ अशा दोन वेळी राज्यात छापेमारी करून बीएचआर घोटाळ्यातील संशयितांना अटक केली आहे. यातील १७ जून रोजी अटक केलेल्या ११ पैकी अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद),जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), राजेश लोढा (जामनेर) या संशयितांनी जामिन अर्ज दाखल केले होते. तर यापैकी जयश्री तोतला आणि जयश्री मणियार या दोघांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने २५ जून आधीच फेटाळून लावलेला आहे.

त्यानंतर २ जुलै रोजी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या जामीन अर्जावर सुनवाई झाली. यावेळी जयश्री तोतला यांच्या वकिलाने घोटाळयाबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. आम्ही नियमाप्रमाणे कर्ज भरलेले आहे. ३० टक्क्यात पावत्या मॅचिंग कशा झाल्या?, याबाबत कंडारेलाच माहिती असलल्याचा युक्तिवाद केला होता. तसेच संशयीतांचा घोटाळ्याशी काहीही संबंध नाहीय. पोलिसांनी केलेली अटक चुकीची आहे. फिर्यादीत आरोपी म्हणून उल्लेख नसतांना बेकायदेशीर अटक केली गेली. तर दुसरीकडे कर्ज घेणे हा गुन्हा नाहीय. आमच्याकडे थकबाकी असल्यास न्यायालयाच्या सुचनेप्रमाणे भरण्यास तयार असल्याचे इतर संशयितांच्या वकिलाने न्यायालयास सांगितले होते.

 

तर आज छगन झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, प्रितेश चंपालाल जैन, प्रेम नारायण कोकटा, राजेश लोढा या उर्वरित संशयितांच्या वतीने अॅड. सुधीर शहा आणि एस.पी. जैन यांनी देखील जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान, आता उद्या सरकार पक्ष आपला युक्तिवाद सादर करणार आहे. तसेच अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद) यांच्यावतीने अॅड. हर्षद निंबाळकर हे देखील उद्याच युक्तिवाद सादर करणार आहेत. न्यायमूर्ती एस एस गोसावी यांच्या न्यायालयात या सर्व जामीन अर्जावर कामकाज सुरु आहे.

 

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
Next Post

अखेर महाराष्ट्रात शाळेची घंटा वाजणार ; ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मी भारतीय जनता पक्षातच आहे, मी फुटलेलो नाही : भाजप नगरसेवक अमित काळे

March 16, 2021

… पण असा माणूस अद्याप जन्माला यायचा ; शिवसेनेची भाजपवर टीका

August 2, 2021

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026

हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या दोन संशयितांना घेतले ताब्यात ; अन्य दोघं फरार !

June 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group