जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील (Jalgaon Bhr Scam) मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक (Liqidator bhr) जितेंद्र कंडारेच्या (Jitendra Kandare) शिक्रापूरच्या गुन्ह्यातील जामीन अर्जावर आज युक्तीवाद पूर्ण झाला असून न्यायालय ११ फेब्रुवारीला निकाल देणार आहे.
बीएचआरमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे. आरोपीने साक्षीदारांना त्रास दिलेला आहे. कटाबाबत काही गोष्टी पोलीस तपासात सांगितलेल्या आहेत. तसेच कंडारेचा गुन्ह्यात महत्वपूर्ण सहभाग असून त्याने पदाचा गैरवापर केलाय. तसेच इतर आरोपींच्या तुलनेत कंडारेचा गुन्ह्यात मोठा सहभाग आहे. तर या गुन्ह्यातील एक महत्वपूर्ण आरोपी सुनील झंवरचा अर्ज याच कोर्टात फेटाळला गेलाय. त्यामुळे कंडारेला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील यांनी विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय आता ११ फेब्रुवारीला निकाल देणार आहे.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेला शिक्रापूर पोलिसांनी २५ डिसेंबरला अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने २९ डिसेंबर पर्यंत कंडारेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानुसार कंडारे पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने कंडारेला पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयाने कंडारेची १३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.