जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात मागील महिन्यात अटक करण्यात आलेल्या सर्व अकरा संशयित आरोपींचा आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलका तसेच पावत्या मॅचिंग केल्याच्या 20 टक्के रक्कम दहा दिवसाच्या आत भरण्यासह इतर अटीं न्यायालयाने संशयितांना घातल्या आहेत.
बीएचआर घोटाळ्यात १७ जून रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यातील विविध भागात धाडसत्र टाकून तब्बल अकरा संशयित आरोपींना अटक केली होती. या सर्वांच्या जामीन अर्जावर पुणे न्यायालयात काही दिवसांपासून सुनवाई सुरू होती. दरम्यान, सर्व आरोपींनीकडे पावत्या मॅचिंग केल्यानंतर उर्वरित रक्कम न्यायालयात भरण्यास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार न्यायालयाने आज सर्व आरोपींना त्यांच्याकडे निघणाऱ्या रकमेची माहिती देत दहा दिवसाच्या आत त्यातील २० टक्के रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले.
तसेच पुढील २० टक्के रक्कम ऑक्टोबर महिन्यात त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्याच अखेरीस संशयितांकडे आणखी किती रक्कम थकबाकी म्हणून दिसत आहे?, त्याचा हिशोब करण्याची जबाबदारी सरकारी पक्ष आणि विद्यमान अवसायकाकडे न्यायालयाने सोपवली आहे. ऑक्टोंबर अखेरीस हिशोब झाल्यानंतर पैसे भरणे बाबत न्यायालयाने त्यावेळी निर्देश देणार आहे. तसेच प्रत्येकी एक लाखाचा वैयक्तिक जातमुचलका भरावा लागणार आहे. तसेच सर्व संशयितांना महिन्याच्या एक आणि पंधरा तारखेला पुणे पोलिसांना हजेरी बंधनकारक करण्यात आलेली आहे. एवढेच नव्हे तर, संशयितांनी ठेवीदारांसोबत कुठलाही संपर्क करावयाचा नाहीये. दरम्यान, यामुळे आता ज्या ठेवीदारांना अवघे ३० टक्के पैसे मिळाले होते. त्यांना आता १०० टक्के रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान सर्व संशयितांना आता दहा दिवसाच्या आत पाहिली २० टक्के रक्कम न्यायालयात भरावी लागणार आहे. सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांचा प्रभावी युक्तीवाद सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण ठरला.
यांचा झाला जामीन मंजूर
भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रीतेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई) आणि प्रेम नारायण कोगटा (जळगाव) यांचा जामीन मंजूर झाला आहे.
विजय वाघमारे (9284058683)