TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : प्रमोद रायसोनीसह व्यवस्थपकाला न्यायालयाने सुनावली साडेतीन वर्षे कारावासाची शिक्षा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआरचे चाळीसगाव शहरात मेजर कॉर्नर शॉपींग कॉम्पलेक्स येथील चार गाळ्यांमध्ये शाखा आहे. या शाखांचे खोटे करारनामे करून गाळे भाडे कराराने देण्याच्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात बीएचआरचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी व तत्कालीन मुख्य व्यवस्थापक सुकलाल शहादु माळी यांना न्यायालयाने साडेतीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

प्रमोद रायसोनीसह व्यवस्थपकाला ‘ही’ शिक्षा सुनावली

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

बीएचआरचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी (वय ६१, रा. बळीरामपेठ) याला साडेतीन वर्षे सश्रम कारावास व २५ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास २१ महिन्यांची साधी कैद तर तत्कालिन मुख्य व्यवस्थापक सुकलाल शहादु माळी (वय ५२, रा. तळेगाव, ता. जामनेर) याला साडेतीन वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

खोटे करारनामे
बीएचआरचे चाळीसगाव शहरात मेजर कॉर्नर शॉपींग कॉम्पलेक्स येथील चार गाळ्यांमध्ये शाखा आहे. ही दुकाने स्वत:च्या नावावर नसताना प्रमोद रायसोनी व त्याची पत्नी कल्पना यांनी ८ फेब्रुवारी २००६ रोजी मुख्य व्यवस्थापक माळी याच्या मदतीने खोटे करारनामे तयार केले. गाळे आपल्याच नावावर असल्याचे या कारारमान्यात नमुद केले. यानंतर या गाळ्यांचे डीपॉझीट म्हणून २५ लाख रुपये घेतले. गाळ्यांच्या मेंटेनेन्सपाेटी दरमहा पाच हजार रुपये घेतले. दरम्यान, २७ ऑक्टोबर २०१५ रोजी पतसंस्था अवसायनात गेली. तर ७ नोव्हेंबर २०१५ रोजी जितेंद्र कंडारे यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले. यानंतर संस्थेच्या शाखा, डीपॉझीट, व्यवहार, डेडस्टॉक, आर्थिक व्यवहार तपासण्यात आले. यात चाळीसगाव शहरातील या चार गाळ्यांचे करारनामे खोटे असल्याचे आढळुन आले.

पतसंस्थेचे सभासद, ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याचे निष्पन्न झाले होते
हे गाळे सुनिता जगन्नाथ वाणी यांच्याकडून कल्पना रायसोनी यांनी १४ जून २००६ रोजी ८ लाख २५ हजार रुपयात खरेदी केल्याचे आढळुन आले. तर संस्थेत हेच गाळे प्रमोद रायसोनीच्या नावे असल्याचे दाखवून पैसे काढून घेतल्याचे समोर आले. त्यामुळे रायसोनी दाम्पत्य व माळी यांनी संगनमत करुन पतसंस्थेचे सभासद, ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार निपीक सुनिल गोपीचंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तीघांच्या विरुद्ध ८ डिसेंबर २०१६ रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पुर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषाराेप सादर करण्यात आले.

प्रमोद रायसोनी व सुकलाल माळी यांना शिक्षा ठोठावली
मुख्य न्यायदंडाधिकारी विनय मुगळीकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. युक्तीवादाअंती न्यायालयाने प्रमोद रायसोनी व सुकलाल माळी यांना दोषी धरुन शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड. रंजना पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी राजेश भावसार यांनी सहकार्य केलेे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

May 9, 2026
गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
क्रीडा

७ व १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
कृषी

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे

May 7, 2026
Next Post

दाभोळकर हत्या प्रकरण : प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने मारेकऱ्यांना ओळखलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today : 18 महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला सोन्याचा भाव, चांदीचा भावही वधारला !

March 7, 2022

क्लिनर ट्रकखाली झोपल्याचे ड्रायव्हरला कळालेच नाही, क्षणात घडलं भयंकर !

October 19, 2023

राजमाता माँसाहेब जिजाऊ जगातील सर्वोत्तम मातृत्व : लक्ष्मणराव पाटील !

January 14, 2023

आ. सुरेश भोळेंच्या पुढाकाराने “जळगाव सिव्हिल”ला हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी

August 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group