भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सावकारे यांनी अँन्टीजन टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यांना आता गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत. अॅन्टीजन टेस्ट पॉझीटीव्ह आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले की, माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना चाचणी करून घ्यावी व घाबरून जाण्याचे कारण नाही निश्चितपणे आजारावर मात करता येते, असेही ते म्हणाले.