भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील छबीलदास मार्केटमध्ये आलेल्या महिलेच्या पर्समधून दोन अज्ञात महिलांनी 15 हजार रुपयांची रोकड तसेच सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. ही घटना 9 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार अर्चना मुर्हे (भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, बुधवार, 9 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता त्या छबीलदास मार्केटमधील ममता क्रिएशन शॉपमध्ये खरेदीसाठी आल्यानंतर दोन अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधून 15 हजारांची रोकड तसेच सात हजारांचा मोबाईल लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठवत तक्रार नोंदवली. पोलिसांनी धाव घेत या भागातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यानंतर त्यात दोन महिला कैद झाल्या आहेत. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक तुषार इंगळे हे करीत आहेत.
















