रावेर (प्रतिनिधी) रावेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. यात कुसुंबा खुर्द येथील अयुब बशीर तडवी (वय ५५), अटवाडे येथील मगन मुरलीधर करवले (वय ४३) आणि रावेरातील रुस्तम चौकातील शेख तौसिफ शेख अफजल (वय ३१) यांच्याविरुद्ध एपीडीए अंतर्गत कारवाई करुन त्यांना ठाणे कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
या तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह व पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले, घनश्याम तांबे, पो.हे.कॉ. रवीद्र चौधरी, पो. कॉ. संभाजी बिजागरे, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, राहुल परदेशी, सुकेश तडवी, अमोल जाधव, विकार शेख, आणि नितीन वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.