TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपला मोठा धक्का ! एकनाथराव खडसेंच्या उपस्थितीत १३ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

The Clear News Desk by The Clear News Desk
February 25, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपला धडका कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्रात खडसेंचा जोर अद्याप ओसरलेला दिसत नाही. कारण भुसावळ नगरपालिकेतील १३ नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

भुसावळमध्ये अलीकडे घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतल्यास भाजपच्या चिंता वाढताना दिसत असली, तरी राष्ट्रवादीसाठीही पक्ष नेतृत्त्वाच्या दृष्टीने पक्षांतर्गत आव्हाने निर्माण करणाऱ्या आहेत, असेही सांगितले जात आहे. नगरपालिका निवडणुकीपूर्वी झालेला हा पक्षप्रवेश भाजपसाठी कठीण जाणार आहे, असेही म्हटले जात आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपला बॅकफूटवर ढकलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला एकनाथराव खडसेंच्या रुपाने मातब्बर नेत्याला आपल्या गळाला लावले. त्यानंतर आता खडसेंच्या माध्यमातून भुसावळातील १३ नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन, नगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप घडवून आणला. जळगाव जिल्हा भाजपसाठी हा मोठा ‘सेटबॅक’ मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली खेळी ही भाजपच्या अडचणी वाढवणारी असून, जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. दुसरीकडे, भुसावळात अलिकडे घडलेल्या घडामोडी या भाजपच्या चिंता वाढवणाऱ्या असल्या तरी राष्ट्रवादीसाठीही पक्ष नेतृत्त्वाच्या दृष्टीने पक्षांतर्गत आव्हाने निर्माण करणाऱ्या आहेत.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह १३ नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक अशा अर्धशतकी संख्या असलेल्या मंडळीनी, १४ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधले. त्यामुळे भाजप पुरता संकटात सापडला आहे. भुसावळ नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत पक्षाला बसलेला झटका हा निश्चितच आगामी निवडणुकीचा स्कोअर कमी करणारा ठरु शकतो. विशेष म्हणजे, भुसावळात भाजपला या झटक्यातून सावरावे तर लागेलच शिवाय राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी सक्षम पर्याय देखील वेळीच उभा करावा लागणार आहे. यासाठी पक्षाकडे फार वेळ नाही. अशा परिस्थितीत भाजपच्या भूमिकेकडे लक्ष असेल.

भाजपला हद्दपार करायचं ठरवलंय

आता लोकांनीच भाजपला हद्दपार करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्याची प्रचिती आली. भुसावळ नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. पण गेल्या साडेचार वर्षांत शहराचा विकास तर सोडा मात्र, शहर अनेक वर्षे मागे पडले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संतोष चौधरी यांनी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

सोशल मीडियासाठी केंद्र सरकारची नियमावली जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रेयसीचा विनयभंग, संतापलेल्या प्रियकराने केली तरुणाची हत्या !

November 6, 2023

राममंदिरावर दहशतवादी हल्ल्याची ‘जैश’ची धमकी ; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर !

June 15, 2024

जळगाव : गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर एसीबीची कारवाई ; गुन्हा दाखल !

February 1, 2025

मोठी बातमी : HotStar वरील आयपीएल आणि चित्रपट, वेबसीरीजचे अनाधिकृत प्रसारण ; जळगाव सायबर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

April 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group