मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीच्या (NCP) विधानपरिषद गटनेते पदी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (MLA Eknathrao Khadse)
एकनाथराव खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आले आहे. तर प्रतोद पदी अनिकेत तटकरे, मुख्यप्रतोद पदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडून विधान परिषदेत आज करण्यात आली. खडसे यांच्या नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानप परीषदेवर आमदार झाले असून आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने मोठी जवाबदारी सोपवली आहे.