TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : चाळीसगावमधील आणखी एका गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ !

जळगाव पोलीस दलाची धडाकेबाज कारवाई सुरूच !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील चाळीसगाव येथील निखील उर्फ भोला सुनील अजबे ( वय २१ ) या गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द ( Mpda Jalgaon) करण्यात आले आहे. चाळीसगाव पोलीस ठाणे आणि जळगाव एलसीबीने याबाबत पाठपुरावा केला होता. दरम्यान, जिल्ह्यात जळगाव पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी आणि पथकाचे धडाकेबाज कारवाई सुरूच आहे.

मागील आठवड्यात चाळीसगाव येथील ११ गुन्हेगारांवर तर जळगाव शहरातील ५ गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा चाळीसगाव शहरातील नारायणवाडी भागातील रहिवासी निखील उर्फ भोला सुनील अजबे ( वय २१) या तरूणावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. (Jalgaon Police)

READ ALSO

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

निखील उर्फ भोला सुनिल अजबे वय-२१ वर्षे रा.नारायणवाडी, चाळीसगांव याच्या विरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दुखापत यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपीस जुलै -२०२२ मध्ये दोन वर्षाकरिता जळगांव जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आलेले होते. हद्दपार कालवधी मध्ये देखील सदर आरोपीने हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन चाळीसगांव शहरात विविध गुन्हे केलेले होते.

या अनुषंगाने आगामी काळात होणार्‍या निवडणुका व विविध जाती-धर्माचे सण-उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी या आरोपींविरुध्द कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जळगांव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत. या आदेशान्वये व अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे आणि सहा.पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक के. के. पाटील आणि सहकारी पोलीस नाईक विनोद भोई, तुकाराम चव्हाण अशांनी वर नमुद इसमाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विना परवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ सुधारणा अधिनियम १९९६, २००९ व २०१५ चे कलम ३ (१) नुसार स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील व त्यांचे सहकारी हवालदार सुनील दामोदरे यांनी तात्काळ पुढील कारवाई करुन प्रस्ताव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना पाठवला होता. दि. ३० रोजी जिल्हादंडाधिकारी यांनी भोला यास स्थानबध्द करण्याबाबतचा आदेश काढला आहे. आरोपीला आज सपोनि सागर ढिकले, पोलीस नाईक अमित बाविस्कर, हवालदार अमोल भोसले, रविंद्र वच्छे यांच्या पथकाने अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची वारंवार होणारी पीक पडताळणी रद्द करा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२१ वर्षाखालील मुलांना लग्न करण्यास बंदी पण लिव्ह-इन मध्ये राहण्याची सूट ; न्यायालयानं सुनावला निर्णय

December 21, 2021

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास, साळवा, खर्दे येथील महिलांचा शिवसेनेत प्रवेश !

September 5, 2023

आयजींच्या पथकाची बायो डिझेल पंपावर धाड ; १५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत !

September 6, 2023

धरणगावात भवानी मातेच्या ऐतिहासिक यात्रोत्सवाचे आयोजन !

April 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group