मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. यावरून वेगवेगळ्या चर्चांना तर्क लावला जात आहे. दरम्यान यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येणार यात शंका नाही, असे खळबळजनक विधान केले आहे.
अंजली दमानिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा संदर्भ दिला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्याी यांच्यावर टीका केली होती. याविषयी अंदली दमानिया ट्वीटमध्ये म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र येणार यात काहीच शंका नाही. जसं लष्करी हल्ला किंवा माघार घेताना कव्हर फायर देतात, तोच प्रकार आपण आज पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार-शाह भेटीला कव्हर-अप करण्यासाठी होती. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजपाविरुद्धच आहोत”.
अंजली दमानिया यांच्या या ट्वीटनंतर पुन्हा एकदा भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार आज दिल्लीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून बरेच राजकीय तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.