जळगाव (प्रतिनिधी) काल रक्षा खडसेंनी गुलाबराव पाटलांची भेट घेतल्याने या भेटीची जास्तच चर्चा होऊ लागली. आता त्या भेटीबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. भेट ही विकासकामाच्या मुद्द्यावरून झाली. केंद्रातील जल जीवन मिशन योजनेबाबतची भेट झाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान, भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत रक्षा खडसेंनी मोठं विधान केलंय.
शिवसेना आणि भाजपच्या छुप्या युतीबाबत रक्षा खडसे यांना विचारले असता, आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर आतापर्यंत अशा युतीबाबत वरिष्ठांचे आदेश नाहीत. मला असे वाटते राज्यात महाविकास आघाडी-भाजप संघर्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यात सेना-भाजप युतीची परिस्थिती राहणार नाही. मात्र निवडणुका पुढे कशाप्रकारे लढवायच्या हे नेतेमंडळी ठरवतील, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मुक्ताईनगरात शिवसेना काँग्रेस गुप्त बैठक यावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या निवडणुका समोर येत असल्यामुळे सर्वच नेते आता स्थानिक लेव्हलवर बैठका घेतील, असे त्या म्हणाल्या आहेत.
तसेच खडसे आणि इतर नेत्यांच्या वादाबाबत विचारले असता, जळगाव जिल्हा हा राजकीय दृष्ट्या अग्रेसर आहे. हे तिघेही नेते नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती पक्ष बळकट करण्याची धुरा आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी पुढच्या निवडणुका कठीण राहणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत उभे केलेले उमेदवार निवडून आणण्याचे चालेंज त्यांच्यापुढे राहणार आहे. त्या कारणास्तवर काही वार-पलटवार सुरू असतील. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.