धरणगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मध्यरात्री काही महिलांनी दारूबंदीसाठी रास्तारोको केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती.
यासंदर्भात अधिक असे की शहरातील पारधी वाडा परिसरातील काही दिवसापासून अवैध दारू विक्रेत्यांनी कहर केला आहे. काल रात्री याच अवैध दारू विक्रीवरून महिला आक्रमक झाल्या. त्यानंतर महिलांनी थेट शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही वेळ प्रचंड खळबळ उडाली होती.