चाळीसगाव (प्रतिनिधी) भगवान महावीर जयंतीनिमित्त चाळीसगाव जीवन सुरभी ब्लडबँक येथे जैन समाज बांधवांतर्फे आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी नगरसेवक व भिमाचा किल्ला जिमखान्याचे अध्यक्ष रोशन जाधव यांनी रक्तदान करून जैन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. शिबिरात रक्तदान करण्याकरिता मनोज सोलंकी, संदेश जैन, प्रमोद गुलेच्या, सुशील जैन, प्रीतेश कटारिया व बबलू जाधव, किरण मोरे आदी उपस्थित होते.