अनोरे ता. धरणगाव (प्रतिनिधी) ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’, रक्तदान हेच जीवदान’ असे समजले जाते. सध्या कोरोनाचा भीषण काळात राज्यात रक्तसाठा कमी पडू लागला आहे. याच पार्श्ववभूमीवर तरुणाईमध्ये रक्तदानचे महत्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानसाठी प्रेरित कारण्याच्या अनुषंगाने अनोरे गावातील ग्रामस्थतर्फे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शिबिरात जवळपास १० ते १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र जळगाव यांनी काम पाहिले. याप्रसंगी गावातील तरुणांनी शिबिरात सहभाग नोंदवून सहकार्य केले. सामाजिक कार्यकर्ते दिनेश तायडे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.