धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील खळ्यातील गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्यांनी ७० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बोरगाव गावात गजानन रवींद्र चव्हाण यांच्या मालकीच्या खळ्यातील गोडाऊनमध्ये गोडाऊनमध्ये टॅक्टर, बॅटरी, टॅक्टरचे साहित्य आणि वेल्डिंग मशीन यासह त्यांच्या उपयोगातील मशीन, असे साहित्य होते. दि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेनंतर अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७० हजाराचे हे साहित्य चोरून नेले. या प्रकरणी गजानन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना.जितेंद्र भदाणे हे करीत आहेत.