जळगाव (प्रतिनिधी) देशासह राज्यात कोरोनाच्या (Corona Virus) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा लक्षात घेता राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याची तयारी सुरु केली असल्याचे वृत्त आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सुरु झालेली रुग्णवाढ नव्या वर्षाच्या सुरुवातीला वेगाने वाढतेय. २०२२ हे निवडणूकीचं वर्ष आहे. यंदाच्या वर्षात राज्यात १० महापालिका (MAHARASHTRA MUNICIPAL ELECTIONS 2022) आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणूका (local body election maharashtra) होऊ घातल्या आहेत. तसेच मुदत संपलेल्या राज्यातील जवळपास 200 नगरपालिकांच्या (nagar palika) निवडणुका अपेक्षित आहेत.
राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरु
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगान तयारी सुरु केली आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. कारण याआधी कोरोनाच्या पहिल्या लाटेत 2020 मध्ये कोरोनामुळे राज्य सरकारने नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबवली या महापालिकांची निवडणूक पुढे ढकलली होती. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) निवडणुका नको अशी राज्य सरकारची भूमिका आहे. राज्य सरकारने तसा ठरावही विधिमंडळात केला आहे. दरम्यान, यावेळी केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एवढेच आरक्षण राहण्याची शक्यता असून इतर मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रभागाला जादा प्रभाग उपलब्ध होणार आहेत. तर दुसरीकडे नगर पालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांमधील जागांच्या संख्येत वाढ झाल्याने वॉर्ड रचनेचे काम निवडणूक आयोगाने सुरू केलं असून ते अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चितीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे
नगरपालिकेच्या निवडणुका एकत्र नव्हे तर टप्याटप्प्याने : एकनाथ शिंदे
राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका या एकत्र नव्हे, तर टप्प्याटप्प्याने होतील, असे वक्तव्य नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर २०२० मध्ये केले होते. तसेच नगरपालिका निवडणुका द्विसदस्यीय पॅनल पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. तसेच नगरपालिकांच्या निवडणुका या एकत्र नव्हे, तर टप्प्याटप्प्याने होतील, असेही वक्तव्य नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.