जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील (Bhr) मुख्य संशयित सुनील झंवरला (Sunil Zavar) आज सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. डेक्कनच्या गुन्ह्यात आज सुप्रीम कोर्टाने झंवरला जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, झंवरला १० ऑगस्ट २०२१ रोजी नाशिकहून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. तेव्हापासून झंवर कारागृहात आहे.
मुख्य संशयित सुनील झंवरने सुप्रीम हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्याला आज जामीन मंजूर झाला आहे. झंवरच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला होता. पोलिस तपासात सुनील झंवर याने अनुप कुलकर्णी तसेच उमाळे नामक दोन साक्षीदारांना धमकाविले होते. या दोघांवर सुनील झंवरने दबाव टाकत सांगितले होते की, तुम्ही पोलिसांना माझ्या बाजूने जबाब द्या किंवा जबाब देण्यास जाऊच नका,असे म्हटले होते. हा मुद्दा जामिनासाठी झंवरला अडचणीचा ठरत होता. परंतू दुसरीकडे शिक्रापूर येथील गुन्ह्यात मुख्य संशयित सुनील झंवरला मुंबई हायकोर्टाने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच अॅड. विजय पाटील यांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातही झंवरला २२ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण आहेत.
अॅड. अनिकेत निकम यांनी आपला युक्तिवाद करतांना न्यायालयासमोर काही महत्वाचे मुद्दे मांडले. त्यानुसार एकाच गुन्ह्याची तीन ठिकाणी फिर्याद देण्यात आली असून ते चुकीचे आहे. तसेच कायद्याला धरून नाहीय. शिक्रापूरच्या गुन्ह्यात ऐकीव माहितीवरून आरोप लावण्यात आलेले आहेत. परंतू ऐकीव माहितीवर आधारित आरोपांमध्ये तथ्य नसते. त्यामुळे अटक करणे कारवाई योग्य होत नाही. गुन्ह्याचा संबंध जळगावशी असतांना देखील गुन्हे मुद्दाम पुण्यात दाखल करण्यात आले. जेणे करून यातील आरोपींना त्रास झाला पाहिजे, असेही अॅड. निकम यांनी म्हटले होते. परंतू डेक्कनच्या गुन्ह्याती झंवर अद्यापही येरवडा कारागृहातच आहे. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टाने झंवरचा जामीन मंजूर केल्याच्या वृत्ताला पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे.