मुंबई (प्रतिनिधी) आमदार गुलाबराव पाटील यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सोमवारी दुपारी अचानक फोन आल्यानंतर गुलाबराव पाटील हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.
अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आजचा मुहुर्त गवसला. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राला आज नवे 18 मंत्री मिळाले आहेत. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी पार पडला. त्यात चंद्रकांत पाटील,विजयकुमार गावित,गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांनी शपथ घेतली होती. तर राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, विजय गावीत, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, रवींद्र चव्हाण, संदीपान भुमरे, दीपक केसरकर, दादा भुसे, तानाजी सामंत यांचा शपथविधी सुरु आहे.