मुंबई / जळगाव (प्रतिनिधी) अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात आलं आहे. आता अंधेरी पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी आयोगासमोर तीन निवडणूक चिन्हांचे पर्याय दिले आहेत. दुसरीकडे धनुष्यबाण गोठवल्यामुळे शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील कमालीचे दुखावले आहे.
ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे, अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात आलं आहे. आता अंधेरी पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही. उद्धव ठाकरेंनी आयोगासमोर तीन निवडणूक चिन्हांचे पर्याय दिलेत. त्याचसोबत पक्षाच्या नावाचेही तीन पर्याय उद्धव ठाकरे यांनी आयोगासमोर संभावित तीन चिन्ह ठेवले आहेत. त्यानुसार 1) त्रिशूळ 2) उगवता सूर्य 3) मशाल असे तीन चिन्ह त्यांनी आयोगासमोर दिले आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने 4 तासांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शिवसेना हे पक्षाचे नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली होती. त्यामुळे आता दोन्ही गटांना नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार होती.
‘धनुष्यबाण’ न मिळाल्यामुळे गुलाबराव पाटील दुखावले, म्हणाले…!
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. धनुष्यबाण गोठवल्यामुळे शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील कमालीचे दुखावले आहे. दोन्हीही गटाची धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी होती मात्र चिन्ह नाही मिळालं याचं आम्हाला दुःख असल्याचे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवास स्थानावरती बैठक बोलावली आहे. या बैठकीत नवीन चिन्ह निश्चित होण्याची शक्यता मंत्री गुलाबराव पाटील यांनी वर्तवली आहे. ते जळगावात बोलत होते.
शिवसेना संपली असा आम्ही कधी म्हणत नाही मात्र ताकदीच्या आधारावर पाहिलं तर दसरा मिळाव्यात कुणाची ताकद वाढली हे सिद्ध होत असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. तसंच, बाळासाहेबांची शिवसेना संपायची असती तर आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो असतो. त्यामुळे कुणी काही म्हणत जरी असलं तरी बाळासाहेबांची शिवसेना आम्ही वाचवली असल्याचे म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.