पारोळा (प्रतिनिधी) गुन्ह्यात दोषारोपपत्र तातडीने दाखल करण्यासाठी तसेच गुन्ह्यात नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तडजोडीअंती आठ हजारांची लाच मागून स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील फौजदार जयंवत प्रल्हाद पाटील यांना जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. जळगाव एसीबीचे पोली उपअधीक्षक सुहास देशमुख व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.
धुळे जिल्ह्यातील तक्रारदार यांच्यासह व त्यांच्या नातेवाईकांवर पारोळा पोलिसात 12 ऑगस्ट 2023 राजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तसेच न्यायालयात दोषारोप पत्र तातडीने पाठवण्यासाठी सुरूवातीला लाचखोर फौजदाराने 30 हजारांची मागणी केल्यानंतर सुरूवातीला 20 हजार स्वीकारली. मात्र, त्यानंतर उर्वरीत 10 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर आठ हजार रुपये देण्याचे ठरले. परंतू लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व बुधवारी दुपारी पाच वाजता लाच स्वीकारताच जयवंत पाटील यास अटक करण्यात आली.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी, सचिन चाटे तसेच पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.