धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचपुराजवळ रुग्णवाहिकेच्या धडकेत म्हैस ठार झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. या अपघातामुळे दुतर्फा वाहतूक विस्कळीत होत, वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील चिंचपुराजवळ आज सायंकाळी साधारण साडेसात वाजेच्या सुमारास एका रुग्णवाहिकेने दोन म्हशींना जोरदार धडक दिली. यात एक म्हैस जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. या अपघातामुळे दुतर्फा वाहतूक विस्कळीत होत, वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. धरणगाव पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सपोनि श्री. अहिरे आणि पोहेका विनोद संदानशिव यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक पुर्वव्रत केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हापर्यंत याबाबत धरणगाव पोलिसात गुन्ह्याची नोंद नव्हती !