धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कवठळ गावातील एका घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने रोकडसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३२ हजार ४०० रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्र ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सुनील बाबुराव पाटील (वय ४०, रा. कवठळ ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २८ मार्च २०२२ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे राहते घराचे उघड्या दरवाजातून आत प्रवेश करुन घरातील कपाटात ठेवलेल्या पेटीचे कुलुप उघडुन व कुलुप परत लावुन १ लाख ३२ हजार ४०० रुपये किमतीचा रोख रुपये व सोन्या चांदीचे दागीने फिर्यादीचे संमती वाचुन लबाडीचे इराद्याने चोरुन नेले. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्र ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन करीत आहेत.
















