जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जुना खेडी भागातील सदाशिव नगरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड, असा एकूण ६७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
या संदर्भात सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायण गरबड चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार १० ऑगस्ट ते २४ सप्टेंबरच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे मेन दरवाज्याचे कडी कोयंडा तोडला. तसेच त्यामागील लाकडी दरवाजाचे सेंटर लॉक तोडून घरात घुसले. यानंतर घरातील सोन्याचे ७ हजार २० रुपयांचे दागिने, रोख रुपये व घरातील इतर सामान एकुण ६७ हजार ५०० रुपयांचा किमंतीचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून स.फो. रघुनाथ महाजन हे करीत आहेत.