पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील महामार्ग क्र.६ वर आज दुपारी एका बसचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एकलग्न गावाजवळ झाला.
जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एकलग्न या गावाजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास इगतपुरी बस (क्र.एम.एच.४०.एक्यू.६०१०) डेपोतील जळगाव शहरातील बस स्थानकावरून निघाली. इगतपुरी जाणाऱ्या बसने भरधाव कंटेनरला मागून धडकल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सूपुत्र तथा माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी लागलीच यंत्रणा फिरवत खाजगी रुग्णावाहिका पाठवून अपघातग्रस्ताना मदत मिळवून दिली. या बसमध्ये एकूण ६२ प्रवासी प्रवास करीत असून अपघातात २ प्रवासी जखमी झाल्याचे कळते.