जळगाव (प्रतिनिधी) राज्यात सुरू असलेल्या राजकिय हालचालींनंतर आज सकाळी खडसे तातडीने मुंबईला (Mumbai) रवाना झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जळगावात खडसेंचा जंगी सत्कार करण्याचे नियोजन केले होते.
विधान परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे विजयी झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जळगावात खडसेंचा जंगी सत्कार करण्याचे नियोजन केले होते. परंतु, राज्यात झालेल्या राजकिय भुकंपाने ठाकरे सरकार अस्थिर झाले आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार टिकते की नाही? यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे खडसेंनी जळगावातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
राज्यातील सध्याच्या घडामोडीत आज मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना उपस्थीत राहण्याचे आदेश कालच काढले आहेत. मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश असल्याचे खडसेंनी सांगितले आहे. यामुळे जळगावातील सत्काराचे कार्यक्रम रद्द करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.