पिंप्री खुर्द ता. धरणगाव, (प्रतिनिधी) – येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पिंप्री शाखेत सेंट्रल बँकेचे संस्थापक सर सोरबजी पोचखानवाला यांची 144 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाखा व्यवस्थापक सौ. रश्मी समल यांनी सर सोरबजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर शाखा उपव्यवस्थापक व्ही. रिबेका शायनी, हेड कॅशियर पूजा चांदुरकर, बँकेच्या कर्मचारीवृंदासह बँक सखी ज्योती बडगुजर यांनीही प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
या कार्यक्रमाला पत्रकार अभय धनगर, संतोष पांडे, राकेश पाटील, विकास जनकवार यांच्यासह बँकेचे अनेक ग्राहक उपस्थित होते. वातावरणात श्रद्धा आणि आदराची भावना व्यक्त होत होती.