धरणगांव (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर, २०२० गुरूवार रोजी स्थानिय महात्मा फुले हायस्कूल धरणगांव येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन. कोळी यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व्ही.पी.महाले यांच्या शुभहस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पुजन करण्यात आले. यानंतर शाळेतील उपशिक्षक हेमत माळी यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे समूह वाचन करण्यात आले व शपथ घेतली. जे. एस. पवार यांनी २६/११ च्या मुंबई हल्यात शहीद जवानांना सामूहिक श्रद्धाजंली वाहण्यात आली. याप्रसंगी शाळेतील शिक्षक जे. एस. पवार, एस. एन. कोळी, हेमंत माळी, व्ही. टी. माळी, पी. डी. पाटील, अशोक पाटील, जीवन भोई, प्रदिप पवार तसेच शिक्षक बंधु-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.