TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“केंद्राने ठरवली स्पुटनिक’सह लसींची किंमत”

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मोफत लसीकरणाच्या केलेल्या घोषणेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी लसीकरणासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार सिरमची कोविशील्ड लस प्रतिडोस जास्तीत जास्त ७८० रुपयांना, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन १,४१० रुपयांना तर रशियाची स्पुटनिक-व्ही लस १,१४५ रुपयांपेक्षा अधिक दराने दिली जाणार नाही.

यासोबतच केंद्र सरकारने २१ जूनपासून लागू होत असलेल्या राष्ट्रीय कोरोना लसीकरणाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार, केंद्र सरकार लसनिर्मात्या कंपन्यांकडून राज्यांच्या कोट्यातील २५ टक्केसह ७५ टक्के डोस स्वत: खरेदी करेल आणि राज्यांना मोफत देईल. हे वाटप लोकसंख्या, कोरोनाचे रुग्ण आणि लसीकरणातील प्रगती या आधारे केले जाणार आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील १८ वर्षांवरील सर्व लोकांना मोफत लस दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. शिवाय जे लोक खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस घेऊ इच्छित आहेत अशांना सेवा शुल्क म्हणून १५० रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेता येणार नाही, असेही जाहीर केले होते. राज्यांनी लस वाया जाऊ नये याची पुरती खबरदारी घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयांना कंपन्या थेट लसीचा पुरवठा करू शकतील, अशी सूटही देण्यात आली आहे.

‘म्युकरमायकोसिस’वरील इंजेक्‍शनचे वितरण जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खासगी रुग्णालयांना वितरित करण्यात येणारी म्युकरमायकोयिस आजारावरील ऍम्फोटेरिसिन-बी हे इंजेक्‍शन आता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत वितरीत केले जाणार आहे. शासकीय व महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांसाठी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांसाठी मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे. राज्य शासनाने या इंजेक्‍शन वितरणाची नवी कार्यपद्धत निश्‍चित केली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

१०० एमएलडी क्षमतेच्या अतिरिक्त साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत सल्लागार समितीचे स्टेशन मास्टर यांना निवेदन !

September 1, 2022

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक ; एलसीबीची कारवाई

October 31, 2020

दोन वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या इरफानची झाली ‘आत्मसन्मान’च्या माध्यमातून कुटुंबियांशी भेट !

August 29, 2022

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 29, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group