धरणगाव (प्रतिनिधी) राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आले. ओबीसी समाजाचे हे आरक्षण पूर्ववत लागू करावे व ओबीसी बांधवांना न्याय मिळावा, यासाठी भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्याच्यावतीने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन धरणगाव येथील उड्डाण पुलावर करण्यात आले.
त्याप्रसंगी भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, व तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, यांनी मनोगतात नाकर्ते महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढुन ओबीसी आरक्षण संदर्भात तीव्र निषेध व्यक्त केला. त्याप्रसंगी चंद्रशेखर अत्तरदे, शिरिषआप्पा बयास, गुलाब बाबा पाटील, तालुकाउपाध्यक्ष पुनीलाल आप्पा महाजन, प्रकाश सोनवणे, शेखर पाटील, कमलेश तिवारी, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, शरद अण्णा धनगर, युवा मोर्चा अध्यक्ष निर्दोष पाटील, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ.विजय पाटील, भालचंद्र पाटील, दिपक पाटील, गुलाब महाजन, वासुदेव पाटील, नाना पाटील, सुनील बडगुजर, प्रवीण पाटील, गोपाळ सोनवणे, शिवदास पाटील, एस.पी.पाटील, संजय पाटील, दगा पाटील, सुदाम मराठे, सुनील चौधरी, जुलाल भोई, आनंद धनगर, टोनी महाजन, कन्हैया रायपूरकर, सचिन पाटील, अजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विशाल पाटील, समाधान पाटील, निलेश महाजन, शुभम चौधरी, विक्की महाजन, गोपाळ महाजन, प्रदीप महाजन, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.