TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव : २०२१ मधील महापूर नुकसानग्रस्तांना मदत म्हणून ६ कोटी ३८ लाखांचे अनुदान मंजूर !

जीवित व पशुधन हानी, घरांची पडझड, गोठे, झोपड्या, कपडे, वस्ती आदींची मिळणार नुकसान भरपाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 29, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघात ऑगस्ट २०२१ या वर्षात अतिवृष्टी, महापूर, ढगफुटीचा मोठा फटका बसला होता. नुकसानग्रस्तांना मदत म्हणून शासनाने ६ कोटी ३८ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. जीवित व पशुधन हानी, घरांची पडझड, गोठे, झोपड्या, कपडे, वस्ती आदींची नुकसान भरपाई मिळणार आहे. दरम्यान, महापूरग्रस्तांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

ऑगस्ट २०२१ महिन्याच्या शेवटी व पुन्हा सप्टेंबर २०२१ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाला होता. त्यामुळे पाटणादेवी अभयारण्य क्षेत्र व गिरणा – मन्याड धरण क्षेत्रात जवळपास एका रात्रीत १४० मिलिमीटर पाऊस झाल्याने प्राथमिक अंदाजानुसार या महापुरात २६६० जनावरांचा मृत्यू, ११२३१ पोल्ट्रीचे पक्षी, २२५० घर व व्यावसायिक दुकानांचे अंशत व पूर्णतः नुकसान, सुमारे १५८०० हेक्टर वरील जमिनी व पिकांचे नुकसान झाले होते.

READ ALSO

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

अचानकपणे आलेल्या महापुरामुळे घरे, जनावरे, गोठाशेड वाहून गेली होती तसेच अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने मोठी वित्तहानी झाली होती. ग्रामीण भागात नदी किनारी असणारी शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांची हजारो छोटी – मोठी जनावरे मृत्युमुखी पडली, नदी किनाऱ्यावरील संपूर्ण घरच वाहून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला होता.

या महापूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नुकताच राज्य शासनाच्या वतीने अनुदान मंजूर झाल्याचा शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. त्यात चाळीसगाव मतदारसंघासाठी ६ कोटी ३८ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे.

यामुळे दुष्काळाच्या गर्तेत असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील महापूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी राज्य शासनाचे व महापूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना मदत मिळवून देणारे चाळीसगाव मतदारसंघाचे संवेदनशील आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

प्रत्येक संकटात चाळीसगाव वासीयांच्या सोबत : आमदार मंगेश चव्हाण

ऑगस्ट २०२१ मध्ये मध्यरात्री झालेल्या महापुरामुळे मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. त्यावेळी महापूरग्रस्त प्रत्येक गावाला भेट देऊन पंचनामे केले होते. तसेच ज्यांची घरे वाहून गेली होती त्यांना तात्पुरती घर देखील स्वखर्चाने उभारून दिली होती. गेल्या २ वर्षांपासून मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित होता. याबाबत माझ्या पाठपुराव्याला यश आले असून जीवितहानी, पशुधन हानी, घर, गोठा, संसारोपयोगी साहित्य अशी वित्तहानी झालेल्या महापूरग्रस्तांना ६ कोटी ३८ लाख निधी प्राप्त झाला आहे. लवकरच सदर मदत त्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

सदर मदत मंजूर केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानतो. कोणत्याही संकटात मी चाळीसगाव वासीयांना एकटे सोडणार नाही, राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहील हा विश्वास यानिमित्ताने देतो, असेही आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
Next Post

आजच्या काळात रोजगाराभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित अभ्यासक्रमच उपयुक्त : प्रा. एम.बी.पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार ९ नोव्हेंबर २०२२ !

November 9, 2022

नववीच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू !

September 24, 2023

महायुती लागली लोकसभेच्या तयारीला ; मेळाव्यांसाठी जळगाव जिल्हा समन्वय प्रमुख जाहीर !

January 10, 2024

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त महापौर जयश्री महाजनांनी केले अभिवादन !

May 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group