धरणगाव (प्रतिनिधी) डॉ. हेडगेवार नगरचे उपसरपंच चंदन पाटील यांची युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
भाजपच्या जळगाव जिल्हा युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात डॉ. हेडगेवार नगरचे उपसरपंच चंदन पाटील यांची युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे भाजपतर्फे कौतुक करण्यात आले आहे.