TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात भरधाव ट्रकने दोन दुचाकीस्वारांना चिरडले, चालकाला नशिराबादजवळ पकडले !

अपघातानंतर ट्रकने तब्बल 14 किलोमीटर फरफटत नेली दुचाकी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात जामनेर तालुक्यातील दोघे ठार झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खडका चौफुलीनजीक घडला. अपघातानंतर ट्रकमध्ये दुचाकी अडकल्यानंतर चालकाने मारहाण होण्याची भीतीने तब्बल 14 किलोमीटरपर्यंत दुचाकी फरफटत नेली मात्र पोलिसांनी नाकाबंदी लावल्यानंतर नशिराबाद टोल नाक्यानजीक ट्रक चालकाला अटक करण्यात आली तर अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक जप्त करण्यात आला. या अपघातात जितू राठोड व प्रकाश उखा तंवर (दोन्ही रा.माधव तांडा, ता.जामनेर) यांचा जागीच मृत्यू ओढवला.

भीषण अपघातात दोघे जागीच ठार !
जितू राठोड व प्रकाश तंवर हे दोघे नातेवाईक प्लॅटीना दुचाकीवरून दीपनगरकडून जळगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव दहा चाकी ट्रक (आर.जे.11 जी.ए.9903) ने दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोघांचा डोक्याला जबर फटका बसल्यानंतर त्यांचा मेंदू बाहेर येवून दोघे जागीच गतप्राण झाले तर ट्रकच्या पुढील भागात दुचाकी अडकली. मारहाणीच्या भीतीने ट्रक चालकाने सुसाट वेगाने ट्रक नशिराबादच्या दिशेने नेला. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी तातडीने नाकाबंदीचे आदेश दिल्यानंतर नशिराबाद टोल नाक्याजवळ पोलिस उपनिरीक्षक सुनील चौधरी व पथकाने ट्रक चालक श्याम बाबू (55, आग्रा, उत्तरप्रदेश) यास अटक केली.

READ ALSO

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

मोबाईलवरून पटली मृतांची ओळख !
पअपघातात मयत झालेल्यांपैकी एकाचा मोबाईलवर येत असलेल्या फोननंतर पोलिसांनी संबंधित कॉलला प्रतिसाद दिल्यानंतर मयतांची ओळख पटली. सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले.

क्रेन लावून काढली दुचाकी !
नशिराबाद टोल नाक्याजवळ ट्रक चालकाला ताब्यात घेतल्यानंतर पथकाने तातडीने क्रेन बोलावली व ट्रकच्या पुढील भागात अडकललेी दुचाकी मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आली. यावेळी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मंगेश चव्हाण व सहकार्‍यांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेत रात्री बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. रात्री उशिरा ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

ओझरखेडा धरणानजीक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादीतील दुफळी पुन्हा उघड ; अभिषेक पाटील यांनी पाठवले कार्यमुक्तीसाठी पत्र !

September 10, 2021

गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक मोतीअप्पा पाटील यांनाही कोरोनाची लागण !

March 26, 2021

लग्नाला गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला !

April 24, 2025

राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहा’निमित्त २५ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणसत्राचे आयोजन

September 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group