TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिमू आणि पिल्लू मला माफ करा, पत्नीला व्हॉटसअॅपवर भावनिक मेसेज पाठवत पोलीस अधिकाऱ्याने उचललं मोठं पाऊल !

चिठ्ठीत लिहिलं असं काही, जे वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी ; पत्नी,आई आणि चिमुकल्यांचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) नांदेडमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने सोलापुरातील आपल्या राहत्या घरात स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांची आत्महत्या ही कामाचा ताण व वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी वाचून तर अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. आनंद मळाळे, असे आत्महत्या केलेले सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

गेल्या महिनाभरापासून आजारी रजेवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले. ही घटना आनंद मळाले यांच्या राहत्या घरात पहाटे चारच्या सुमारास घडली. एका प्रकरणाचा तपास करून पोलीस मुख्यालयाकडे परतत असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यात जबडा फाटल्याने नांदेड येथे उपचार करून त्यांना पुढील उपचाराकरिता सोलापुरात पाठवण्यात आले होते. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून ते घरीच उपचार घेत होते. परंतु ते सातत्याने तणावात असल्याचे दिसून येत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याने आता कुटुंबीयांनी वरिष्ठांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली आहे. यात त्यांनी वरिष्ठांकडून होत असलेल्या त्रासाबाबत आपल्या भावना मांडल्या आहेत. कामाचा ताण व वरिष्ठांकडून होत असलेला आरोप यामुळे मानसिक संतुलन ढळल्याने सपोनि आनंद मळाले यांनी गोळी झाडून जीवन संपवले. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.

आनंद मळाले हे मूळचे सोलापूरचे. पण सध्या नांदेड येथे कार्यरत होते. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्षे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम पाहिले होते. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार याठिकाणी सेवा बजावली. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती.

बिलोली पोलीस ठाण्यात नेमणुकीवर आल्यावर वेळेवर पोलीस मदत न मिळणे, तपासाला दिलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ होणे, कोणत्याही प्रकारचा मदतनीस गुन्ह्याच्या तपासकामी न देणे, जातीयदृष्ट्या संवेदनशील असणारे व मुदतीत दोषारोपपत्र पाठवणे आवश्यक असणारे गुन्हे तपासाला देणे यांसारख्या गोष्टी त्यांच्याबाबतीत सातत्याने घडत आहेत, अशी त्यांची धारणा होती. वरिष्ठांकडून मदत न होता सातत्याने त्रास होत होता. गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा, दिरंगाई, आरोपीला मदत होईल, असे कार्य केले म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून त्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, त्यामुळे ते निराश झाले होते.

ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचा आहे ऋणी !
‘बॅचमेट’ विषयी चिठ्ठीत लिहिले आहे की, माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मोलाची साथ दिली, त्या सर्वांचा मी ऋणी आहे. माझ्या पश्चात पत्नी व माझा मुलगा यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये, ही माझी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे.

चिमू आणि पिल्लू मला माफ करा !
‘चिमू आणि पिल्लू मला माफ करा, मी तुमच्यासाठी काही एक भरीव योगदान देऊ शकलो नाही. अपेक्षा करतो की, माझ्या पश्चात तुम्ही दोघेही जीवाचे रान करून चांगल्या भवितव्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. पिल्लूला माझे अनेक शुभाशीर्वाद, उज्ज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. चिमू मला माफ कर…’, असे चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
Next Post

मित्रांसोबत पोहायला गेलेले दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात खाजगी वाहन चालकाची आत्महत्त्या !

August 17, 2021

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना महावितरणचा दिलासा !

December 10, 2022

पुण्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त, तानाजी सावंतांच्या कार्यालयावर हल्लाबोल 

June 25, 2022

अवघ्या पाच हजार रुपयांच्या वादातून एकाचा खून ; कन्नड घाटात फेकला होता मृतदेह !

October 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group