जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कानळदा रोडवरील रिक्षा स्टॉप परिसरात असलेल्या सट्टा जुगाराच्या अड्डयावर शहर पोलिसांनी कारवाई करत ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विजय शामराव पाटील व पंकज शिंदे यांना कानळदा रोडवर सुरु असलेल्या सट्टा जुगाराच्या अड्डयाबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विजयसिंग ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ, उमेश भांडारकर, संतोष खवले, भास्कर ठाकरे, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने कारवाई करत ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात मनोज प्रकाश भोसले (वय २५ रा. गेंदालाल मिल) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.