
जळगाव (प्रतिनिधी) – शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक गिरीश रमणलाल भावसार यांच्या अध्यक्षतेखाली आर आर विद्यालयात मराठी सप्ताह संपन्न झाला. व्यास पीठावर ज्येष्ठ शिक्षक संजय पिले, संध्या पाटील मराठी विभाग प्रमुख अपर्णा वाणी उपस्थित होते. अपर्णा वाणी यांनी मनोगत व्यक्त करून अभिजात मराठी भाषा महत्व वर्णन करून सांगितले. विद्यार्थ्यांनी मराठी पाठ्य पुस्तकातील विविध कविता गायन वाचन करून सादर केल्या . मराठी राजभाषेचा अभ्यास पूर्ण माहिती सांगितली. विविध गाणे, गोष्टी, पोवाडे , विनोद, नकला, विनोदी गीतगायन, नृत्य, समूह गीत, सादर केल्यात. निरंजन सोनवणे या विद्यार्थ्याने पोवाडा सादर केला. मातृभाषेची थोरवी वर्णन करून दिली. अक्षय महाजन, श्रीपाद पाठक यांनी संगीत साथ दिली. प्रभारी मुख्याध्यापक गिरीष भावसार यांनी मनोगतात मराठी मातृभाषेचा आपल्या बोली भाषेत दररोज वापर करून मातृभाषेचा आग्रह धरण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी टी. बी . पांढरे, डी.बी. साळुंखे, प्रवीण पाटील, योगेश चौधरी, किशोर सोनवणे,जयाशू पोळ, सुधीर महाजन ,आर पी. पाटील, डी डी जोशी यांनी सहकार्य केले. लीना तायडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . गिरीष महाजन यांनी सर्वांचे आभार मानले.
गिरीष रमणलाल भावसार
स्काऊट शिक्षक
रावसाहेब रूपचंद विद्यालय जळगाव
9890576589

















