धरणगाव (प्रतिनिधी) शहरात दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. दरम्यान, भरवस्तीत चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील राजपुत मंगल कार्यालय जवळ राहणारे भगवान गोकुळसिंह बयस व लोहार गल्ली येथील ज्ञानेश्वर माळी यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. सकाळी घटना माहित पडल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना बोलवले. दरम्यान, ज्या दोन घरांमध्ये चोरी झाली ते दोघंही घर मालक बाहेर गावाला गेले होते. त्यामुळे चोरट्यांनी बंद घरे टार्गेट केल्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला आहे. घटनास्थळी शिवसेनेचे सहसंपर्क गुलाबराव वाघ,भाजप गटनेते कैलास माळी आणि धीरेंद्र पुरभे यांनी भेट दिली होती.
















