जळगाव (प्रतिनिधी) आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानूसार जिल्ह्यात ४०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आज ८२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनास काहीसा दिलासा दैनंदिन मिळत आहे.
जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर- ९१, जळगाव ग्रामीण- १३, भुसावळ-६६; अमळनेर-२९; चोपडा-३०; पाचोरा-२; भडगाव-४; धरणगाव-२०; यावल-३३; एरंडोल-२१; जामनेर-१८; रावेर-७; पारोळा-२४; चाळीसगाव-२५; मुक्ताईनगर-१०; बोदवड-०५ आणि इतर जिल्ह्यांमधील ५ असे एकुण ४०३ रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, आज ८२० रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्यांची संख्या ३६,७८१ इतकी झाली आहे. तर आज ८ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११४५ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रीय रूग्ण ८३४९ इतके आहेत.