जळगाव (प्रतिनिधी) – घरात शिरुन लोखंडी पेटीचे कुलूप तोडून चोरट्याने गोकुळ नवल चव्हाण (वय १९, रा. धानवड, ता. जळगाव) यांच्या घरातून ३० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. ही घटना दि. २ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धानवड येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील धानवड येथे गोकुळ चव्हाण हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. २ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटा त्याच्या घरात शिरला. त्याने चवहाण यांच्या घरातील मागील रुममध्ये ठेवलेल्या लोखंडी पेटीचे कुलूप तोडले. त्यानंतर त्याच्यात ठेवलेले ३० हजार रुपयांची रोकड चोरुन तो पसार झाला. सकाळी उठल्यानंतर चव्हाण यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी दि. ३ जून रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मुकुंद पाटील हे करीत आहे.
















