धरणगाव (प्रतिनिधी) येथे मलेरिया व डेंग्यू तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हनुमान नगर येथील कन्हैया माळी मित्र परिवाराच्यावतीने गावात औषध फवारणी करण्यात आली.
शहर व परिसरात गेल्या महिन्यापासून पावसाचा खेळ सुरू असून, परिणामी साथीच्या विविध आजारांचा फैलाव सुरू आहे. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील दवाखाने रुग्णांनी रोजच भरत आहेत. याकरिता साथरोगाला अटकाव घालता यावा म्हणून कन्हैया माळी मित्र परिवाराच्यावतीने बजरंग चौक, हनुमान मंदिर, पारोळा नाका, भोई वाडा, दादाजी नगर तसेच पारोळा नाकापासून पाटचारी पर्यंत सार्वजनिक ठिकाणी, वस्त्यावंर फवारणी यंत्राद्वारे २५ लिटर औषध मिसळून तीन हजार लिटर व हायड्रोजन पेरॉक्साइड, जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली.
औषध फवारणीसाठी कन्हैया माळी, दिपकराव मराठे, गजानन टायगर माळी, पिंटू माळी, सखाराम माळी, दत्ता माळी, नंदा माळी, गोलू मराठे, पंकज मराठे, गणेश माळी, गजानन माळी, गणेश कुंभार, विजय माळी, राहुल माळी, महेश मराठे, देविदास महाजन, ज्ञानेश्वर माळी, डिगंबर मराठे, गोटू माळी, रोहित पाटील, रविंद्र माळी, शिवाजी माळी, गोपाळ माळी, राहुल माळी, राजेंद्र भोई, किरण माळी, गणेश माळी, सागर माळी, गोरख माळी, अजय माळी, मोहन माळी, निलेश टायगर माळी या तरुणांकडून याकामी पुढाकार घेत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.