TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे व थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयाच्या परीसरात कोणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असतील अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकत असतील अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेत.

 

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा मौखिक आरोग्य व तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ऑनलाईन पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद पांढरे, श्रीमती विद्या राजपूत, डॉ नितीन एस भारती, जिल्हा सल्लागार, निशा कटरे, सायकॉलॉजीस्ट, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समितीचे उपाध्यक्ष डॉ पंकज आशिया, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त योगेश बेंडकुळे, अशासकीय सदस्य नरेंद्र पाटील, डॉ गोविंद मंत्री, मुकुंद गोसावी, राज मोहम्मद खान शिकलकर, श्रीमती गोस्वामी, प्राचार्य, का ऊ कोल्हे विद्यालय, सलाम मुंबई फाऊंडेशन, पोलीस, गटविकास अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, मनपा, जळगाव, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी हे दूरचित्रवाणीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी राऊत पुढे म्हणाले की, तालुकास्तरावर तालुका तंबाखू नियंत्रण समन्वय समितीने या कार्यक्रमाबाबत बैठक आयोजित करून आपल्या तालुक्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. यासोबतच मौखिक आरोग्याची जनजागृती करताना लहान मुलांच्या दंत व मौखिक आरोग्यावर विशेष भर द्यावा. सर्व शासकीय विभाग / कार्यालय प्रमुख यांचे सोबतच पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने कोटपा कायद्यातील विविध कलमातंर्गत कारवाई करण्याचे निर्देशही दिलेत.

बैठकीच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी कार्यक्रमाचे महत्त्व आणि सुरू असलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली. तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था उपक्रमातील yellow line campaign करिता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत एका शाळेमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती दिली. जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ संपदा गोस्वामी यांनी मौखिक आरोग्य कार्यक्रमातील उपक्रमाचे महत्त्व व उपक्रमाबाबत सांगितले. तर जनजागृती सोबतच तंबाखू मुक्त शाळांचा उपक्रम जिल्हाभर राबवून शिक्षण विभागाच्या सहकार्यानें जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे समितीचे अशासकीय सदस्य राज मोहम्मद खान शिकलकर यांनी बैठकीत सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

नवापूर तालुक्यातील आश्रम शाळेच्‍या आवारात विद्यार्थ्यांचा आढळला मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘भविष्यातील रोजगाराच्या संधी’वर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

August 26, 2021

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; चौघांना अटक !

August 31, 2023

गळा आवळून केला खून; रस्त्यावर टाकून दिला मृतदेह

January 11, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group