TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सार्वभौमत्व जपण्यास कटिबद्ध : राजनाथ सिंह

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘मतभेदांच्या मुद्द्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यावर भारताचा भर आहे. असे असले, तरीही एकाधिकारशाही आणि आक्रमकतेचा सामना करताना आपले सार्वभौमत्व आणि भौगोलिक अखंडता यांचे रक्षण करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे स्पष्ट प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

या भाषणात संरक्षणमंत्री राजनाथ यांनी पाकिस्तानवरही टीकास्त्र डागले. पाकिस्तान दहशतवादाचा धोरण म्हणून वापर करत असून याबाबत त्या देशाचा हेकेखोरपणा कायम आहे. मात्र, याबाबत प्रगतिशील आणि समविचारी देशांच्या सहकार्याने आम्ही काम करत आहोत, त्यायोगे पाकिस्तानचे कारनामे उघड करण्याच्या जोडीलाच त्या कारवायांना आळा घालण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे राजनाथसिंह म्हणाले. राजनाथसिंह यांनी अमेरिका, जपान आणि रशिया या देशांसोबत वाढत्या द्विपक्षीय संबंधांबद्दलही या वेळी माहिती दिली. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असतानाच, अन्य शेजारी देशांसोबत भारताने संबंध सुधारले आहेत. परस्पर सन्मानाचे व हिताचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी मदत व पाठिंबा यामध्ये आम्ही मोठी गुंतवणूक केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्व लडाखच्या भागात भारत चीन सीमेवर गेले सात महिने तणाव कायम असतानाच, संरक्षणमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. सीमावादावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या लष्करी पातळीवरील चर्चेची आठवी फेरी आज, शुक्रवारी होण्याची शक्यता आहे. त्याच्या पूर्वसंध्येला संरक्षणमंत्र्यांनी मांडलेली ही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’च्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही भूमिका मांडली. ‘शांतता कायम राखण्यासाठी युद्ध टाळणे महत्त्वाचे आहे, मतभेदांना वादाचे स्वरूप येऊ नये, अशी भारताची भूमिका आहे आणि सीमावर्ती भागात शांतता राहावी यासाठी केलेल्या सर्व करारांचा सन्मान करण्यास भारत वचनबद्ध आहे,’ असेही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

१०-१२ वीच्या परीक्षा मे महिनाअखेरीस - शिक्षणमंत्री गायकवाड यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘पोलीस दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना आदराने खुर्चीवर बसवतात’ : भाजप आ. सुरेश भोळे

November 14, 2021

आर्ट गॅलरीमुळे जळगाव शहर आता सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येणार : कुलगुरू डॉ. माहेश्वरी !

November 4, 2022

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करा ; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

November 22, 2021

अहमदनगर-श्रीगोंदाजवळ मालगाडी घसरली; दौंड-मनमाड वाहतूक विस्कळीत

December 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group