धरणगाव (प्रतिनिधी) येथील अर्बन बँकेच्या संचालक म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजयशेठ कोठारी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
अर्बन को ऑप. बँक लि. धरणगाव या बँकेच्या चेअरमनपदी प्रविण कुडे तर, व्हा. चेअरमन अंजनीकुमार मुंदडा यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच संचालक म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजयशेठ कोठारी यांचा सत्कार राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपकभाऊ वाघमारे तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी श्रीजी जिनिंगचे संचालक नयनशेठ गुजराथी तसेच महावीर पतसंस्थेचे संचालक अरविंदकुमार ओस्तवाल, मनोहर कोठारी, चेतन कोठारी आदी उपस्थित होते.