TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर : कैलास वडाळे मर्डर मिस्ट्रीत फिल्मी स्टाईल टर्न आणि ट्वीस्ट !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2023
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) जांभूळ ता. जामनेर येथील कैलास विठोबा वडाळे यांच्या मर्डर मिस्ट्रीत फिल्मी स्टाईल टर्न आणि ट्वीस्ट सुरूच आहेत. संशयित आरोपी रमेश संपत मोरे (वय ५६) याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिल्यानंतर गुन्ह्याची संपूर्ण उकल झाल्याचे वाटले. परंतू मोरे याने पोलिसांना खुनाचे कारण न सांगितल्यामुळे तपासात नवीन टर्न आला. एवढेच नव्हे तर, ज्या ठिकाणी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलिसांना सांगितले, तो परिसरही पोलिसांनी पिंजून काढल्यानंतरही मृतदेह आढळून न आल्यामुळे या प्रकरणात आता पुन्हा नवीन ट्वीस्ट आलाय. मृतदेह सापडत नसल्यामुळे या मर्डर मिस्ट्रीत दृश्यम चित्रपटाप्रमाणे टर्न आणि ट्वीस्ट सुरु आहेत.

नेमकं काय घडलं !
जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील रहिवासी कैलास विठोबा वडाळे १३ मे रोजी दुपारी ३ वाजेपासून बेपत्ता झाले होते. परिवारातील लोकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यामुळे मुलगा अविनाशने १४ मे रोजी पहूर पोलीस स्टेशनमध्ये वडील कैलास वडाळे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पहूर पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांचा कुठंही शोध लागला नाही. एक-एक करीत महिना उलटून गेला. पण कुठलीच माहिती हाती लगत नव्हती. शेवटी कैलास वडाळे यांच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेतली आणि सर्व हकीगत सांगितली. पोलीस अधीक्षकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत याबाबतचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला करण्याचे आदेश दिले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे पथक कामाला लावले आणि अवघ्या काही तासात वडाळे यांचा मित्र रमेश मोरे याल ताब्यात घेतले.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

मित्र रमेश मोरेला अटक !
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरवायला सुरुवात केली. त्यानुसार गावातून माहिती मिळाली की, कैलास वडाळे यांची रमेश संपत मोरे यांच्यासोबत घट्ट मैत्री होती. परंतू मित्र बेपत्ता झाल्यानंतरही रमेश याने कधीही कैलास यांच्या परिवाराशी संपर्क केला नाही. अगदी कुटुंबाकडे साधी विचारपूससुद्धा केली नव्हती. तसेच मयत कैलास यांच्यासोबत शेवटी त्यालाच बघण्यात आले, असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचा धागा सापडला. यानंतर दोनच दिवसात २० जूनला स्थानिक गुन्हे शाखेने रमेश मोरे याला अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने कैलास वडाळे यांचा खून केल्याची कबुली दिली. दि. १३ मे रोजी रमेश आणि कैलास हे दोघेही जांभूळ येथे रस्त्यालगत दारु पीत होते. त्यानंतर त्याने दगड आणि कुऱ्हाडीच्या मदतीने हत्या केली. आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली., अशी कबुली दि. २१ जून रोजी पोलिसांना दिली. मात्र मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली, हे अद्यापही त्याने पोलिसांना समजू दिले नाही. या प्रकरणात आणखीही संशयितांची चौकशी सुरु असल्याचे कळते.

तोरनाळा जंगलात मृतदेहाचा शोध !
रमेश मोरे याने खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांना घटनास्थळ दाखवले. पोलिसांना घटनास्थळी मयताचे कपडे, मोबाईल व इतर वस्तू सापडल्या. मात्र कैलास वडाळे यांचा मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे कैलास वडाळे यांचा मृतदेह शोधण्यासाठी एलसीबी पथक व पहूर पोलीसांनी रमेशला दिवसभर घेऊन घटनास्थळ शोधले. त्याने तोरनाळा ता. जामनेर येथे मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलिसांना सांगितले. त्याप्रमाणे रात्री पोलिसांनी तोरनाळा जंगल पिंजून काढला. पण मृतदेह आढळला नाही. त्यामुळे रमेश पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे समोर येत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
Next Post

नातेवाईकांना भेटून घरी परत जायला निघाले, क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; पती-पत्नीचा अपघाती मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांच्या सेवेत… पंढरपुरात मंत्री गिरीश महाजन यांचे तब्बल १२ ते १४ तास गर्दी नियोजन; भाविकांच्या सुरक्षिततेला दिले सर्वोच्च प्राधान्य

July 25, 2026

चोपडा येथून मोटार सायकल चोरट्यास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

March 1, 2021

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…, ५ तारखेला एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

December 3, 2020

धरणगाव येथे ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्त साधून राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन

April 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group