पाचोरा (प्रतिनिधी) शहरात जोरदार पावसाने व्ही.पी. रोडवरील तीन मजली इमारत सोमवारी २० रोजी रात्री दहाच्या सुमारास पात्यासारखी कोसळली होती. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनास्थळी पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट दिली असून नगर परिषदने तात्काळ मटेरियल उचलुन इमारतीचा नुकसान पंचनामा करण्यात यावा, असे सांगितले.
शहरातील व्हीपी रोड वरील मुंबई निवासी साजेदाबी खालिफा याच्यां मालकीची तीन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्या सारखी कोसळली. सदर दुर्घटनाग्रस्त इमारतीचा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. या इमारतीच्या आत जे भाडेकरू होते ते तीन दिवस आधीच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी खाली करायला लावले होते. त्यामुळे सुदैवाने तो पुर्ण परीवार बालबाल वाचला. त्यातच शेजारी राहणारे निसार शेख, सागर शेख, शकील शेख इस्माईल यांच्या सह इतरांनी गेल्या आठ दिवसांपासून या रस्त्यावरून कोणीही येजा करु नये यासाठी प्रयत्न करीत होते तर आजुबाजुला राहणारे घरे रिकामी करण्यात आली होती. घटनास्थळी पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी रात्री भेट देत पुन्हा सकाळी पहाणी करून नगर परिषद ने तात्काळ मटेरियल उचलुन इमारतीचा नुकसान पंचनामा करण्यात यावा, असे सांगितले. या इमारतीचे मुळ मालक अद्याप आले नाही.