TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर, लॉकडाऊन करण्यापेक्षा स्वयंशिस्त पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.

ते म्हणाले की, मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. आजपासून ४ दिवसांनी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी प्राणपणाने अतिरेक्यांशी सामना केला. आजही आपण काही महिन्यांपासून या कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू भगिनींना करतो आहे. यंदा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा देखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला, मी आपला मुख्यमंत्री आहे त्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान असे असू नये म्हणून नियम माझ्यापासून काटेकोरपणे पाळले नाही तर तुम्हाला काही सांगायचा अधिकार नाही. दिवाळीत फटाके वाजवू नका असे मी सांगितले आणि आपण माझे ऐकले आणि यंदा खूप कमी फटके उडाले. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

आरोग्याची चौकशी जिव्हाळ्याने व्हावी

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविताना यंत्रणेतील सर्व लोकांनी अफाट काम केले आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जन जागृती करणे हे साधेसुधे काम नाही. या मोहिमेचा हेतू केवळ चौकशी करणे नाही तर आरोग्य नकाशा तयार करणे आहे. यामध्ये आपल्याला किती जणांना सहव्याधी आहे ते कळले. या सर्वांशी यंत्रणेतील लोकांनी एक जिव्हाळा दाखवून संपर्क साधणे व चौकशी करणे महत्वाचे आहे.

दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल

मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे कीकाय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ज्येष्ठ नागरिक , सहव्याधीना सांभाळा

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांना आहे. आजपर्यंत आपण त्यांना सांभाळून होतो. आता कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये वाढतोय आणि त्यांच्या माध्यमातून घराघरातल्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत होतोय हे निश्चितच खूप धोकादायक आहे. आज आपल्या हातात लस नाही, कधी येईल ते सांगता येत नाही. आली तरी राज्यातल्या सर्व लोकांना अगदी दोन डोस द्यायचे म्हटले तरी २४ ते २५ कोटी जनतेला द्यावी लागेल.
त्यामुळे केवळ मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात धूत राहणे हीच त्रिसूत्री आहे. कोविडनंतर रुग्ण खडखडीत बरे सुद्धा होत आहेत पण पण पोस्ट कोविड दुष्परिणाम सुद्धा दिसताहेत. आपण कशासाठी विषाची परीक्षा बघायची असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि, आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन सावधपणे पावले टाकत आहोत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

भाजपतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : लग्न समारंभातून नववधूचे ४ लाख ६० हजारांचे दागिन्यांची चोरी !

July 15, 2024

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

December 28, 2021

५ कोटीच्या धरणगाव – सोनवद रस्त्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

November 21, 2023

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group