नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,३७७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २,४९६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात १७,८०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 801 इतकी झाली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 2,496 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 753 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 72 हजार 176 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतोय. देशात गेल्या 24 तासांत 3,377 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 2,496 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार झाली आहे. काल 3,303 नवीन रुग्णांची नोंद झाली. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 801