धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना कोरोना चाचणी शिघ्रगती तसेच सुलभतेने व्हावी यासाठी “फिरते कोरोना चाचणी पथक (Mobile Covid-19 Rapid Testing Van) सुरू केलेले आहे. याद्वारे शहरातील नागरिकांची घराजवळ, गल्लीमध्ये अथवा शक्य त्या ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
तरी धरणगाव शहरातील ज्या नागरिकांना कोरोना चाचणी करायची असेल त्यानी पुढील लिंक वर क्लिक करून आपले नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी झाल्यानंतर नगरपरिषद मार्फत आपल्याशी संपर्क केला जाईल व आपल्या ठिकाणी अथवा दारी येवून कोरोना चाचणी करता येईल. ज्यामुळे रुग्णांचे वेळेवर निदान होवून उपचार होईल.
कोरोना चाचणी करणेसाठी नाव नोंदणी करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
https://forms.gle/bLFMq3HE67Hcqird6;